esakal | मुंबई, ठाणे आणि रायगडकरांनो लवकरात लवकर घरी पोहोचा, पुढील काही तास आहेत धोक्याचे
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई, ठाणे आणि रायगडकरांनो लवकरात लवकर घरी पोहोचा, पुढील काही तास आहेत धोक्याचे

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुढील ३ ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगडकरांनो लवकरात लवकर घरी पोहोचा, पुढील काही तास आहेत धोक्याचे

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मुंबई ठाणे आणि रायगड परिसरात पुढील काही तासात जोरदार पावसासाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रायगड, मुंबई आणि ठाण्यात विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत आज दिवसभर वातावरण ढगाळ होतं , मुंबईत मळभ दाटून आलेलं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर पुढील काही तासांमध्ये मुंबईत, रायगड आणि ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिलाय. पुढील काही तासात विजेच्या कडकडाटासाठी पोषक ढग जमले असल्याचं रडारवर पाहायला मिळतंय . या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आलाय. 

महत्त्वाची बातमी  : आशिष शेलार यांना धमकीचे फोन; पोलिसांच्या चौकशी नंतर दोघांना अटक

संध्याकाळची वेळ ही मुंबईकरांची कामं संपवून नोकरीवरून घरी जाण्याची वेळ असते. अशात मुसळधार पावसाची हजेरी लागल्यास मुंबईत मोठा ट्राफिकजॅम पाहायला मिळू शकतो.  

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुढील ३ ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एकंदरीतच राज्याचं वातावरण बदललंय आणि त्यामुळेच मुंबई , ठाणे आणि रायगडमध्येही ढगाळ वातावरण सोबतच मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

महत्त्वाची बातमी :अनिल परब यांना तातडीने लिलावतीमध्ये हलवलं, मुख्यमंत्र्यांनी रद्द केली मातोश्रीवरील बैठक
 

दरम्यान पावसाच्या शक्यतेमुळे नागरिकांनी लवकरात लवकर आपल्या घरी पोहोचावं असं देखील हवामान विभागाने म्हंटल आहे. सध्या हवामानातील आर्द्रता वाढल्याने उकाडा देखील वाढणार असल्याचं वेधशाळेकडून सांगितलं जातंय. 

heavy rains expected in mumbi thane and raigad in next fews hours