Mumbai Rain Update: रेल्वे वाहतुकीला पावसाचा फटका! लोकलचा खोळंबा, प्रवाशांचे हाल
Mumbai Local Train: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसला आहे. ठाण्याहून मुंबई दिशेला जाणारी वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांना परतीचा प्रवास करण्यासाठी कसरत करावी लागली.
ठाणे : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसला. सकाळी नोकरी-धंद्यावर निघालेल्या चाकरमान्यांचा ठाणे स्थानकात खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.