
अंबरनाथ : मुसळधार पावसामुळे पाणी साचणे, गटार तुंबणे आणि पाणीपुरवठा दूषित होण्याची शक्यता वाढली. त्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एम.जे.पी.) नागरिकांना खबरदारी घेण्याचे जाहीर आवाहन केले आहे. यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असून नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत.