पालघर जिल्हातही विक्रमी पाऊस; वसई-विरारला पाणीपुरवठा करणारे कवडास धरण ओव्हरफ्लो... 

संदीप पंडित
Wednesday, 5 August 2020

पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केल्यानंतर पाऊस गायब झाला होता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झले होते परंतु गेल्या दोन  दिवसांपासून सुरु झालेल्या पावसाने शेतकरी आनंदित झाला आहे.

विरार : पालघर जिल्ह्यात काही दिवसापूर्वी दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसात दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली असून धरणक्षेत्रातही चांगला पाऊस  झाल्याने धरणातील पाणीसाठा वाढला आहेत. वसई विरारला पाणी पुरवठा करणारे कवडास धरण ओव्हरफ्लो झाल्याने वसई विरार पाण्याची समस्या सुटली आहे. जिल्ह्यात 265.44 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर शेतकरीही या पावसाने आनंदित झाले आहेत.

मुंबईची लाईफलाईन पुन्हा ठप्प; तीनही रेल्वेमार्गावर पाणी भरले...

पालघर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केल्यानंतर पाऊस गायब झाला होता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झले होते परंतु गेल्या दोन  दिवसांपासून सुरु झालेल्या पावसाने शेतकरी आनंदित झाला आहे. तसेच शहरी भागात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणांमधील पाण्याचा साठा वाढला आहे. वसई विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी धामणी धरणात 57.49 टक्के, तर कवडास धरणात 100 टक्के पाणीसाठी झाला आहे. 

नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु

त्याशिवाय उसगाव धरणात 36.49 टक्के, पेल्हार धरण 84.69 टक्के पाणी साठा झाला आहे पालघर जिल्ह्यात डहाणू आणि पालघर  तालुक्यात  सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे तर मोखाडा तालुक्यात सर्वात कमी 87.55 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. 
======
पालघर जिल्ह्यात आज झालेला पाऊस

 • वसई:- 196 मिमी
 • जव्हार:- 162.0 मिमी
 • विक्रमगड:-187.0 मिमी
 • मोखाडा:- 87.55 मिमी
 • वाडा :- 222.0 मिमी
 • डहाणू :- 465.28 मिमी
 • पालघर:-379.93 मिमी
 • तलासरी :- 423.8 मिमी
 • -----
  संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rains in palghar district, kavadas dam overflows