मुंबईत पावसाचे सात बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

मुंबई - मुसळधार पावसाने सोमवारी मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे विविध दुर्घटनांत मुंबईत तिघांचा, विरार आणि कळव्यात प्रत्येकी एकाचा; तर उल्हासनगरमध्ये दोघांचा मृत्यू झाला. वडाळा येथे इमारतीच्या पार्किंगचा भाग खचल्याने संरक्षक भिंत कोसळून १० वाहनांचे नुकसान झाले. 

मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने अनेक महत्त्वाचे रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे वाहतुकीचा बोऱ्या उडाला. रेल्वे वाहतूकही २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होती. विरारमध्ये नारिंगी फाटकाजवळ वज्रेश्‍वरीतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी मॅजिक रिक्षा तुंबलेल्या पाण्यात अडकली. रिक्षात आठ विद्यार्थी होते. शर्थीचे प्रयत्न करीत त्यांना रिक्षाचालकाने सुखरूप बाहेर काढले; मात्र तो पाण्यात वाहून गेला. उल्हासनगरमधील वडोल गावातील मलनि:सारण केंद्राची संरक्षक भिंत कोसळून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला; तर रविवारी रात्री उशिरा मुसळधार पावसात मोटार अपघातात प्राध्यापकाचा मृत्यू झाला.

Web Title: Heavy rains Seven dead in Mumbai