
ठाणे शहर : नवरात्राेत्सवाच्या चौथ्या दिवशी पावसाने उघडीप दिल्यामुळे माेठ्या प्रमाणावर गरबाप्रेमी बाहेर पडले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक काेंडी झाल्याचे पाहायला मिळाले. बाळकूम, माजिवडा आणि घोडबंदर रस्त्यासह गल्लीबाेळातील रस्त्यांसह वाहनांची गर्दी झाली. यात ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या रिक्षा, बस अडकून पडल्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना रिक्षा, बससाठी तासन्तास ताटकळत राहावे लागले. सायंकाळपासून जवळपास चार तास ही परिस्थिती असल्यामुळे ठाणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला.