esakal | बोटीतील खलाशाला हेलिकॅप्टर ने 12 तासानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश..
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बोटीतील खलाशाला हेलिकॅप्टर ने 12 तासानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश..

sakal_logo
By
विजय गायकवाड

नालासोपारा :- वसईच्या (Vasai) समुद्र किना-यावर (Sea) संशयास्पद आढळलेल्या बोटीची (Boat) 12 तासा नंतर ओळख पटली आहे .भाईंदर (Bhayandar) उत्तन (Uttan) समुद्रात उभी केलेल्या बोटीची (Boat) दोरी तुटल्याने ती भरकटून वसईच्या (vasai) भुईगाव (Bhuigaon) समुद्रात आली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे . भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॅप्टर (Helicopter) ने बोटीतील (Boat) खलाशाला रेस्क्यू (Rescue) करून सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळविले आहे .

mumbai

mumbai

सध्या बोटीच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्याने बोट समुद्रातच आहे. तिला दुसऱ्या बोटीने बाहेर काढण्यात येणार आहे. तर आज शुक्रवार सकाळी बोटीचा मालक हि घटनास्थळावर पोहचल्याने या सर्व संशयास्पद बोटीचा उलगडा झाल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे .

बोट मालक आणि रेस्क्यू केलेला खलाशी या दोघांनाही वसई पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचा तपास सुरु केला आहे . मात्र हि बोट दोरी तुटल्यानेच भरकटली होती का ?जर भरकटली तर मालकाने तात्काळ संबंधित यंत्रणांशी का संपर्क केला नाही ?यांचा अन्य कुणाशी संबंध आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत .

हेही वाचा:  हल्लेखोर बिबट्याची रेस्क्यू टिमला पुन्हा हुलकावणी

रफिक शेख असे रेस्क्यू करून काढलेल्या खलाशाचे नाव आहे . तर रापटर काळूखे असे बोट मालकाचे नाव आहे. संशयास्पद आढळलेली बोट ही स्टील लॉन्च करणारी बोट आहे. वसईच्या भुईगाव आणि कळंब परिसरातील समुद्रात काल ही बोट संशयास्पद आढळली होती. भुईगाव परिसरातील 15 माईल्ड अंतरावर खोल समुद्रात हि बोट खडकावर अडळाल्याने अडकली होती. संशयास्पद बोट असल्याने सर्व शासकीय यंत्रणा कालपासून सतर्क झाल्या होत्या. वसई पोलीस, कोस्टल गार्ड, मेरिटाईम बोर्ड यांच्याकडून संयुक्त कारवाही केली आहे. आज सकाळी बोटीचा मालक राप्टर काळूखे हा व्यक्ती समोर आल्याने बोटीची ओळख पटली आहे.

loading image
go to top