पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

तुर्भे - केरळमधील पूरग्रस्तांसाठी वाशीतील केरळ भवनमध्ये शहरातील नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. येथून केवळ आठवडाभरात जवळपास पाच जहाजे आणि तीन ट्रक मदत केरळला रवाना झाली आहे. केरळमध्ये पुराने हाहाकार माजवल्याने त्यांना मदत करणाऱ्यांचे हात पुढे येत आहे. ही मदत केरळ पर्यटन विभागाकडून थेट केरळमधील आपत्कालीन विभागाकडे सुपूर्द केली जात आहे.

वाशी रेल्वेस्थानक परिसरात केरळ भवन आहे. या ठिकाणी केरळमधील नागरिकांसाठी मदत म्हणून धान्य, बिस्किटे, औषधे आदी वस्तू जमा केल्या जात आहेत. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत एक कोटी मुख्यमंत्री मदत निधीसाठी पाठवला आहे. त्यासाठी भूपेश बाबू आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी पुढाकार घेतला होता. याबरोबरच विकास सोर्टे यांनी तांदूळ आणि जीवनावश्‍यक वस्तू पाठवल्या आहेत. केरळ भवनमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ, पाणी, ब्लॅंकेट, कपडे आदी वस्तू जमा केल्या जात आहेत. स्टेट बॅंक, ॲक्‍सिस बॅंक, केंद्रीय सुरक्षा दल, एलआयसी, गुरुद्वार, भाजप, काँग्रेस, नवी मुंबई पॉलिटिक्‍स ग्रुप आदी संस्थांनी पुढाकार घेऊन मदत दिली आहे. हा मदतीचा ओघ सुरूच असला, तरी आता पुनर्वसन कार्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य लागणार असल्याने ते देण्याचे आवाहन केले जात आहे. दुबईमधील नागरिकांनी विजेचे साहित्य दिले असून, आता रोगराईला प्रतिबंध घालण्यासाठी सफाईचे साहित्य आणि औषधांची गरज असल्याचे केरळ पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Help for kerala flood victims