ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

मुंबई - ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी (वय 81) यांचे सोमवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे.

मुंबई - ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी (वय 81) यांचे सोमवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे.

शास्त्रज्ञ असलेल्या हेमू अधिकारी यांनी अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटविला होता. "डिटेक्‍टिव्ह नानी', "लगे रहो मुन्नाभाई' आणि "वजूद' या हिंदी चित्रपटांत त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी "जुलूस', "संध्याछाया', "हसवा फसवी' या नाटकांसह नाटकांमध्ये काम केले. त्यांचे "नाट्य विज्ञान समाजेन' हे पुस्तक गेल्या वर्षी सृजन प्रकाशनाने प्रकाशित केले होते. लोकविज्ञान व अण्वस्त्रविरोधी शांतता चळवळीत त्यांचा सहभाग होता.

Web Title: hemu adhikari death