बाईक सोडून त्यांनी ठोकली धूम, शाब्बास रोझमारी

बाईक सोडून त्यांनी ठोकली धूम, शाब्बास रोझमारी

नवी मुंबई  : घणसोलीत रहाणाऱया एका 32 वर्षीय तरुणीने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तीच्या हातातील मोबाईल फोन खेचून मोटरसायकलवरुन पळून जाण्याचा दोघा लुटारुंचा प्रयत्न फसल्याची घटना शुक्रवारी भर दुपारी रबाळे येथे घडली. यावेळी दोघा लुटारुंनी आपली मोटरसायकल त्याच ठिकाणी सोडून पलायन केले असून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्यांची मोटरसायकल ताब्यात घेऊन त्यांचा शोध सुरु केला आहे. 

या घटनेतील तरुणीचे नाव रोझमारी पॅट्रीक रॉबर्ट (32) असे असून ती घणसोलीतील समर्थ नगरमध्ये रहाण्यास आहे. रोझमारी हिचा कपडे विक्रीचा व्यवसाय असून या व्यावसायानिमित्त शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ती रबाळे रेल्वे स्टेशनवरुन पायी चालत रबाळे MIDC तील गौरी फॅशन या दुकानात जात होती. यावेळी ती आपल्या मोबाईलवर बोलत गावदेवी मंदिरासमोरील नाल्याजवळ आली असताना, तीच्या पाठीमागून मारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंपैकी एका लुटारुने रोझमारी हिच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र याचवेळी रोझमारी हिने प्रसंगावधान दाखवत दोघा लुटारुचा पाठलाग करुन त्यांची मोटरसायकल पाठीमागून पकडून ठेवली. त्यामुळे घाबरलेल्या मोटारसायकल चालकाने रोझमारी हिचा मोबाईल फोन रस्त्यावर फेकुन देत त्याठिकाणावरुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. 

मात्र रोझमारी हिने न घाबरता मोटरसायकल चालकाला पकडून आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली.त्यामुळे त्या भागातील नागरिक तीच्या मदतीसाठी आल्यानंतर दोघा लुटारुंनी आपली मोटरसायकल त्याच ठिकाणी सोडून पलायन केले. या घटनेनंतर रोझमारी हिने नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन सदर घटेनची माहिती दिली. त्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघा लुटारुंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी सदर लुटारुंची मोटरसायकल ताब्यात घेऊन त्यांच्यावर जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाची बातमी : मध्य रेल्वेवरील आवारा पागल दिवाने..

दरम्यान, रोझमारी रॉबर्ट या तरुणीने न घाबरता दोघा लुटारुंना पकडण्याचा प्रयत्न केल्याने तीचे कौतुक होत आहे.  

WebTitle : with her presence of mind she saved her mobile 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com