15 ऑगस्टच्या धर्तीवर हाय अलर्ट

रविंद्र खरात 
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

- देशभरात 15 ऑगस्ट निमित्त हाय अलर्ट केला आहे. 

- या धर्तीवर कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कल्याण वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बेशिस्त रिक्षा चालकासहीत खासगी वाहन चालकांवर कारवाई करत दणका दिला आहे.

कल्याण : देशभरात 15 ऑगस्ट निमित्त हाय अलर्ट केला आहे. या धर्तीवर कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कल्याण वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बेशिस्त रिक्षा चालकासहीत खासगी वाहन चालकांवर कारवाई करत दणका दिला आहे.

मुंबईसह, दिल्ली, पंजाब यासारख्या मोठ्या शहरात येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईसह दिल्ली इतर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान कल्याण रेल्वे स्थानक, एसटी डेपो आणि परिसर नेहमीच वाहनांची वर्दळ असते आणि बेशिस्त रिक्षा चालक सहीत अनेक वाहन चालकाना मुश्किल होते . 15 ऑगस्टच्या हाय अलर्ट पाहता आज मंगळवार 13 ऑगस्ट रोजी कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे यांच्या समवेत वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांविरोधात कारवाई करत बेशिस्त रिक्षा चालकासहित अन्य वाहन चालकांना ही चांगलाच दणका दिला . 

बेशिस्त रिक्षा आणि वाहन चालकांविरोधात प्रतिदिन कारवाई होते. 15 ऑगस्टच्या हाय अलर्टच्या धर्तीवर ही कारवाई सुरू असून रिक्षा आणि वाहन चालकांनी नियमांचे पालन करत कागदपत्रे सोबत ठेवून वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी केले आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High alert declared on fifteenth august