मुंबईत हाय अलर्ट, ड्रोन उडवण्यास पोलिसांची बंदी 

पूजा विचारे
Tuesday, 27 October 2020

मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. याच पार्श्वभूमीवर दहशतवादी मुंबईला टार्गेट करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे  मुंबई पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मुंबईः मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. याच पार्श्वभूमीवर दहशतवादी मुंबईला टार्गेट करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे  मुंबई पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 

ड्रोनसदृश्य उपकरणातून हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला असल्याचं समजतंय. गुप्तचर यंत्रणांनी मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती कळवली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला. तसंच सुरक्षेत वाढही करण्याची सूचना देण्यात आली आहे. 

अधिक वाचा-  अनोखी भेट, चांदीच्या शिक्क्यामध्ये राज ठाकरेंची प्रतीमा

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात ड्रोनसह फ्लाईंग असलेल्या ऑब्जेक्ट्स उडवण्यास पोलिसांनी तात्काळ बंदी घातली आहे.  ३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली. या काळात मुंबईमध्ये सुरक्षा बंदोबस्त देखील वाढवला जाण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा-  CSTM वर नवे प्रतिक्षालय गृह सुरु, 10 रूपयांमध्ये तासभर करता येणार प्रतिक्षा

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी फायदा घेत करण्याच्या इराद्यात असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी मुंबईकर मोठया प्रमाणावर घराबाहेर पडतात. यावेळी वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

High alert in Mumbai police ban on flying drones


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High alert in Mumbai police ban on flying drones