
Mumbai Savarkar Sadan
ESakal
हिंदुत्ववादी विचारवंत विनायक सावरकर यांचे दादर येथील निवासस्थान सावरकर सदनला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देणार की नाही? सदनाचे संवर्धन करणार की नाही ? अशी विचारणा सोमवारी (ता.२२) उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. तसेच लवकरात लवकर याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले.