Court
sakal
मुंबई : अंधेरी पश्चिमेतील सुमारे ४८ हजार ८९७ चौरस मीटर जमीन संपादनावरून सुरू असलेल्या वादाप्रकरणी उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दणका दिला. या वादाप्रकरणी एस. एन. देसाई हॉस्पिटॅलिटीज अँड डेव्हलपर्स एलएलपी या कंपनीला १,०६१ कोटी ९२ लाख रुपयांची वाढीव भरपाई देण्याचे आदेश मुंबई महापालिकेला देण्यात आले.