मुंबई : मालाड मढ येथील बेकायदा बांधकामांसंबंधात २४ हजार कागदपत्रांसह प्रमाणपत्र गहाळ झाल्याची बाब माहितीच्या अधिकाराअंतर्गत उघडकीस आल्याचे शुक्रवारी (ता. २६) याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर नाराजी व्यक्त करून इतक्या मोठ्या प्रमाणात कागदपत्रे गहाळ झालीच कशी, असा संतप्त सवाल न्यायालयाने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना विचारला.