

HIgh Court On FSSAI action
ESakal
मुंबई : मॅकडॉवेल्स आणि ओल्ड मॉन्क रमवरील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) कारवाईवर सोमवारी (ता. १०) उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच हा वाद उत्पादनांची गुणवत्ता किंवा सुरक्षिततेपेक्षा लेबलिंगशी (लेबल लावण्याच्या पद्धतीशी) संबंधित असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.