high court
Esakal
मुंबई, ता. १० : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील 'कन्व्हेन्शन आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स' पूर्ण करण्यास कथित विलंब झाल्याप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला बजावलेल्या कोट्यवधी रुपयांच्या वसुली नोटिसा उच्च न्यायालयाने रद्द केल्या. प्राधिकरणाची ही कृती मनमानी असल्याचेही न्यायालयाने कंपनीला दिलासा देताना नमूद केले. तसेच कंपनीने यापूर्वीच जमा केलेली ६४६.७७ कोटी रुपयांची रक्कम ९० दिवसांत परत करण्यास बजावले आहे. Mumbai High Court gives big relief to Reliance