

Mumbai Mahalakshmi Temple Redevelopment
ESakal
मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात झालेल्या व्यापक बदलांबाबत मंदिर ट्रस्टच्या १९१२च्या योजनेत सुधारणा करण्यास उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली. भाविकांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी ट्रस्टने काळासोबत पाऊल उचलले पाहिजे, तसे असले तरीही पुनर्विकास हे व्यावसायिक शोषणाचे साधन बनू नये, अशी टिप्पणीही न्यायालयाने नोंदवली.