Mumbai High Court
esakal
मुंबई : रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशाकडे रेल्वेचे तिकीट नाही म्हणून त्याला नुकसानभरपाई नाकारणे याेग्य नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने रेल्वे न्यायाधीकरणाचा निर्णय रद्द केला. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सहा टक्के व्याजासह म्हणजे आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.