राष्ट्रीय सुरक्षेला धोका ३ वर्षांनी लक्षात आला, २३ मजली इमारत बांधेपर्यंत झोपलेलात का? हायकोर्टाचा नौदलाला सवाल

Mumbai News : नौदलाच्या तळापासून हेलिपोर्टपासून २४६ मीटर अंतरावरील इमारत सुरक्षेला धोका असल्याचा आणि ती संरक्षण विभागाच्या परवानगीविना उभारण्यात आल्याचा आरोप नौदलाने केला आहे. या प्रकरणी हायकोर्टानं फटकारलंय.
High Court Questions Navy on 23 Storey Building Issue

High Court Questions Navy on 23 Storey Building Issue

Esakal

Updated on

कुलाब्यातील नौदल हवाई तळ आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिपोर्टपासून २४६ मीटर अंतरावरील ही इमारत सुरक्षेला धोका असल्याचा आणि ती संरक्षण विभागाच्या परवानगीविना उभी राहिल्याचा आरोप करून आयएनएस शिक्राच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनी (सीओ) उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे विकसकाशी संगनमत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही फौजदारी कारवाईचे आदेश देण्याचा इशारा न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com