Election Commission
esakal
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यास शुक्रवारी (ता. ७) उच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच यासंदर्भात दाखल याचिकांवरील निर्णय न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी, मतदारयादी, सीमांकन आणि आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उत्तर दाखल करण्याचे आदेशही मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोग (एसईसी) आणि राज्य सरकारला दिले.