

BMC
Esakal
मुंबई : महालक्ष्मीस्थित १७० वर्षे ऐतिहासिक धोबीघाटाच्या जागेचा समावेश झोपडपट्टी पुनर्वसन (झोपु) प्रकल्पात केल्यावरून उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. योग्य कायदेशीर प्रक्रियेविना पिढ्यान्पिढ्या या जागेचा वापर करणाऱ्यांचे हक्क सुरक्षित न करता महापालिकेची मौल्यवान जमीन अन्य कारणांसाठी वापर करू शकत नाही, असा इशाराही न्यायालयाने महापालिकेला दिला.