Mumbai High court
Esakal
मुंबई : 'भारतीय नोंदणीचे वाहन परदेशातील प्रवासानंतर समुद्रमार्गे कंटेनरमधून भारतात परत आणले, म्हणून ते नव्याने आयात केलेले विदेशी वाहन ठरत नाही,' असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने नुकताच दिला. तसेच न्यायालयाने रशियन नागरिक डेनिस व्हॅनिनच्या जप्त केलेल्या महिंद्रा थार या वाहनाच्या सुटकेचे आदेश दिले.