

Ramesh Mhatre
ESakal
मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका रुग्णालयातील तीन डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना उच्च न्यायालयाने दणका दिला. कल्याण दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या जामिनाला उच्च न्यायालयाने शनिवारी (ता. १८) विशेष सुनावणी घेऊन स्थगिती दिली. तसेच म्हात्रेना रविवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांना शरण येण्याचे आदेश देताना आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा इशाराच न्यायालयाने दिला.