Mumbai High court
Esakal
मुंबई : शांतता पूर्ण आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; परंतु अशा आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीसह स्थानिक रहिवासी, विद्यार्थी यांची गैरसोय होणार नाही, अशा अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे, असे मत उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. १९) व्यक्त केले. एखादी आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती उद्भवली तर काय करावे? अशी विचारणाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली.