

Mumbai Weather
ESakal
मुंबई : मुंबईसह परिसरात मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात आणि आर्द्रतेत वाढ झाल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२७ वर पोहोचल्याने घामाघूम झालेल्या मुंबईकरांना उकाड्यासोबतच प्रदूषित हवेचाही सामना करावा लागला.