Mumbai Pollution: प्रदूषणाची नियमावली कागदावरच! उच्च न्यायालयाचे ताशेरे; उच्चस्तरीय समितीचे सूताेवाच

Mumbai High Court: वायू प्रदूषण रोखण्यासाठी एमपीसीबी अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत उच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याचे सूताेवाच जारी केले आहेत.
Mumbai air Pollution

Mumbai air Pollution

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईसह आसपासच्या परिसरातील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशांचे ठोस अनुपालन करण्यात आलेले नाही. नियमांचे पालन करण्यात मुंबई, नवी मुंबई महापालिकेसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) अपयशी ठरल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २९) ओढले. प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे न्यायालयाने सूताेवाच केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com