Mumbai High Court
esakal
मुंबई
Mumbai News: राज्य सरकारला नोटीस! शिक्षकांविरोधात तक्रारीप्रकरणी न्यायालयाचे आदेश
Mumbai High Court: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रारीबाबत उच्च न्यायालयाने दखल घेत राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
मुंबई : शिक्षक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध बाहेरील व्यक्तींकडून केलेल्या तक्रारी स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात याव्यात किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयानेही दखल घेतली आणि राज्य सरकारला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
