मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; टीव्ही मालिकांच्या अभिनेत्रींची सूटका

राजू परुळेकर
Sunday, 25 October 2020

हिंदी आणि पंजाबी मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या महिलांना पैशाचे अमिश दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या सिनेसृष्टीतील दलाल अभिनेत्रीला गुन्हे शाखेने अटक केली.

अंधेरी : हिंदी आणि पंजाबी मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या महिलांना पैशाचे अमिश दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या सिनेसृष्टीतील दलाल अभिनेत्रीला गुन्हे शाखेने अटक केली. विविध भाषेतील मालिकांमध्ये काम करणाऱ्या तिघा अभिनेत्रीची सुटका करण्यात आली. अटक केलेल्या दलाल अभिनेत्रींच्या विरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बोलल्याप्रमाणे फडणवीस कोरोनाच्या उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल

सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून काम करणारी महिला दलाल असून तिचे बॉलिवूडशी चांगले संबंध आहेत. सदर महिला विविध मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना पैशाचे अमीश दाखवून वेश्यागमनासाठी पुरविण्याचे मोठे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवीत होती. याबाबत गुन्हे शाखा युनिट-१२ च्या प्रभारी अधिकारी महेश तावडे व पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी दलाल अभिनेत्रीला संपर्क करून बोगस ग्राहक पाठविले. ग्राहकांच्या मागणीनुसार तिने तीन मालिकांमधील अभिनेत्री यांना तयार करून ग्राहकाकडे १० लाख ५० हजाराची मागणी करण्यात आली. ग्राहकांसाठी वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पंचतारांकित हॉटेल बुक करण्यात आले.

सत्ता महाविकास आघाडीची परंतु नेतृत्व शिवसेनाच करणार - संजय राऊत

बोगस ग्राहकाच्या माहितीनुसार पोलीस पथकाने सापळा रचला. पोलिसांनी अटक केलेली सिनेसृष्टीतील दलाल महिला २७ वर्ष असून तिचे सिनेसृष्टीतील अभिनेत्री आणि बॅले डान्स करणाऱ्या डान्सरसोबत संपर्क होता. त्यामुळे आरोपी महिला ही सिनेसृष्टीतील महिलांशी संपर्क करून पंचतारांकित हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवीत होती त्याचा पर्दाफाश पोलीस पथकाने केला.

-------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High profile racket exposed in Mumbai Release of TV series actresses