काकुभाई लाखाणी माध्यमिक विद्यालयात शाळाप्रवेश स्वागतोत्सव सोहळा

अच्युत पाटील
शुक्रवार, 15 जून 2018

तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी 25 वर्षापासून सुरू असलेल्या आचार्य भिसे शिक्षण संस्थेच्या वनरावन काकुभाई लाखाणी माध्यमिक विद्यालयात शाळाप्रवेश स्वागतोत्सव सोहळा, सकाळ वृत्तपत्र समुहाच्या सौज्यन्याने व गुजरात राज्यातील उंबरगाव औद्योगिक वसाहतीतील गारमेंट असोशिएशनचे अध्यक्ष आर.के.नायर यांच्या हस्ते पार पडला.

बोर्डी - तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी 25 वर्षापासून सुरू असलेल्या आचार्य भिसे शिक्षण संस्थेच्या वनरावन काकुभाई लाखाणी माध्यमिक विद्यालयात शाळाप्रवेश स्वागतोत्सव सोहळा, सकाळ वृत्तपत्र समुहाच्या सौज्यन्याने व गुजरात राज्यातील उंबरगाव औद्योगिक वसाहतीतील गारमेंट असोशिएशनचे अध्यक्ष आर.के.नायर यांच्या हस्ते पार पडला.

संस्थेचे कार्यवाह विजय म्हात्रे, कार्यकारणी सदस्य अच्युत पाटील, खजीनदार श्रीकांत सावे, माजी मुख्याध्यापक भुपेंद्र सावे, मुख्याधिपिका दिपा पाटील, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थी, पालकांची मोठी गर्दी होती.

उंबरगाव गारमेंट असोशिएशनचे अध्यक्ष आर.के.नायर यांनी विद्यार्थांंच्या स्वागतासाठी खास उपस्थिती लावली होती. श्री नायर यांचे शुभहस्ते दै. सकाळचा अंक, गुलाबपुष्प आणि एक पेन देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याधिपीका दिपा पाटील, विजय म्हात्रे, आर.के.अच्युत पाटील यांनी सहकार्य केले. पालकांनी सकाळच्या शाळाप्रवेश स्वागतोत्सवाचे भरभरून कौतुक केले.

Web Title: High school admission ceremony at Kakubhai Lakhani Secondary School