देशातील हिंदू जागा आहे : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

मुंबई : दरवर्षी प्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर घनाघाती टिका केली. या देशातील हिंदू जागा आहे. आम्हाला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आम्ही शिल्लक ठेवणार नाही असे म्हणत नाव न घेता ठाकरे यांनी भाजपवर टिका केली. आगामी होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

जनता समोर होरपळताना दिसत असूनही सरकार दुष्काळ जाहीर करत नाही. कर्नाटक सरकार मागील अहवाल तपासून निर्णय घेऊ शकते पण केंद्रात आणि राज्यात सरकार असूनही दुष्काळ जाहीर करण्यात धमक सरकार दाखवत नाही. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.

शिवसेना काय भूमिका घेणार असाच कायम प्रश्न विचारला जोता. हाच प्रश्न संघाला का विचारत नाही. भाजपला सत्तेत बसविण्यात संघाचा मोठा हात आहे. संघाने त्यांना विचारायला हव की तुम्ही सत्तेत का बसलात. एक लक्षात ठेवा 2014 सालची हवा आता राहिली नाही. तुम्हाला सर्वांना घेऊन मी मोठी टक्कर दिली होती.

देशात पेट्रोल, डिजे, गॅसचे भाव रावण बनून उभे आहेत. आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून देशद्रोही, देशविरोधी म्हटले जाते. पण आज देशात सुरू असलेला कारभार तुम्हाला मान्य आहे का? राज्यात दुष्काळाचा राक्षस उभा आहे. पुढचा पावसाळा कधी लवकर आला तर बर. मराठवाडा होरपळतोय मग अशा वेळी सरकारच्या विरोधात बोलायला नको का. असे बोलत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर कठोर टिका केली. हेच सांगताना त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्या आठवणी सांगितल्या. सरकारे येतील आणि जातील पण देश टिकाल पाहिजे हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाक्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. 

Web Title: The Hindu alert in the country : Uddhav Thackeray