संरक्षण द्यायला जमत नसेल तर, प्रत्येकाला बंदूका द्या : संदीप देशपांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandip Deshpande
प्रत्येकवेळी हिंदूंनी गोळ्या खायच्या का? संरक्षण द्यायला जमत नसेल तर प्रत्येकाला बंदूका द्या

संरक्षण द्यायला जमत नसेल तर, प्रत्येकाला बंदूका द्या : संदीप देशपांडे

डोंबिवली - काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांची हत्या सुरु आहे. तेथील हिंदूंना टार्गेट करण्यात येत आहे. ते गोळ्या घालणार आणि हिंदूंनी केवळ बघत बसायचे का? असा सवाल करीत मनसे नेते संदिप देशपांडे म्हणाले, हिंदूंना स्वसंरक्षणाचा अधिकार नाही का? हिंदूंना मारणाऱ्याकडे विना परवान्याचे शस्त्र असतील तर आम्हाला बंदुका आणि परवाने द्या, स्वसंरक्षण करण्याचा अधिकार घटनेने प्रत्येकाला दिला आहे. प्रत्येकाला संरक्षण देणे केंद्र सरकारला शक्य नसेल तर बंदुका तरी द्या. प्रत्येक वेळी हिंदूंनी काय गोळ्या खायच्या का? अशी ज्वलंत प्रतिक्रीया देशपांडे यांनी कल्याण येथे दिली. काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांचे हत्या सत्र सुरु आहे. केंद्र सरकारने येथील हिंदूंना शस्त्र परवाने देऊन हाती बंदुका द्याव्यात अशी मागणी ट्विटरद्वारे त्यांनी सरकारकडे केली होती. याविषयी त्यांनी पुन्हा कल्याणमध्ये केंद्र सरकारला टार्गेट करत प्रतिक्रीया व्यक्त केली.

मनसेच्या कामगार संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी कल्याणमध्ये शुक्रवारी आंदोलन छेडले असून त्या कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रशासनाची भेट घेण्यासाठी मनसे नेते संदिप देशपांडे व संतोष धुरी कल्याणमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार बरोबर राज्यातील आघाडी सरकारमधील नेत्यांचांही त्यांनी खरपूस समाचार घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना कोरोना झाल्यावर टिका केली होती. मास्क वापरत नाही, आता दुसऱ्यांना कोरोना झाला, ऑपरेशन देखील रखडले असे पवार म्हणाले होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या या विधानाचा समाचार घेताना देशपांडे म्हणाले, उपमुख्यमंत्री मास्क घालून फिरतात त्यांनाही कोरोना झाला. राज ठाकरे यांना कोरोना झालेला नाही त्यांच्यामध्ये कोरोनाचे डेड सेल्स आढळले आहेत, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. अर्धवट माहितीच्या आधारे उपमुख्यमंत्र्यांनी तरी बोलू नये.

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद गेल्या काही दिवसांपासून भाजपा व मनसेवर आरोप प्रत्योरप करीत आहेत. सय्यद यांच्याविषयी ते म्हणाले, काही लोकांबद्दल न बोललेलंच चांगलं. चिखलामध्ये दगड मारला तर आपल्याच अंगावर चिखल उडतो. हे आम्हाला लहानपणी शिकविले होते. त्यामुळे आम्ही कधी चिखलात दगड मारण्याचा प्रयत्न करत नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेले पत्रक घरोघरी वाटण्याचे आवाहन पक्षातील पदाधिकाऱ्यांना राज यांनी केले आहे. मुंबईत पत्रक वाटताना पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईविषयी ते म्हणाले, पोलिसांची ज्या पद्धतीचे मनमानी दादागिरी व हुकूमशाही चाललेली आहे ती निषेधार्ह आहे. पत्रके वाटणे चुकीचे आहे का? असा सवाल करत ते म्हणाले, शिवसेनेच्या लोकांनी काही केलं तरी चालतं वरुण सरदेसाई यांनी पोलिसांना शिव्या घातल्या तरी चालतात आम्ही पत्रक वाटलं तर आम्हाला ताब्यात घेतल. हुकूमशाही आहे का? शिवसेनेचं राज्य म्हणजे काय तालिबानी राज्य आहे का असा संतप्त सवाल त्यांनी केला.

Web Title: Hindus Take Bullet Every Time You Cant Afford Protection Give Everyone A Gun Sandip Deshpande

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top