भारतीय नौदलाच्या महिलांची ऐतिहासिक कामगिरी; केली नव्या विक्रमाची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Navy Women

मुंबई नौदलातील पाच महिलांनी उत्तर अरबी समुद्रात नुकत्याच पार पडलेल्या मोहिमेमुळे एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.

भारतीय नौदलाच्या महिलांची ऐतिहासिक कामगिरी; केली नव्या विक्रमाची नोंद

मुंबई - मुंबई नौदलातील पाच महिलांनी उत्तर अरबी समुद्रात नुकत्याच पार पडलेल्या मोहिमेमुळे एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. डॉनीअर २२८ एअरक्राफ्टच्या मदतीने पहिले वहिली अशी समुद्री क्षेत्रात महिलांच्या टीमची गस्त मोहीम यानिमित्ताने पार पडली. या मोहिमेत एकुण पाच मिशन कमांडरचा समावेश होता. पोरबंदरच्या महिलांच्या चमुने ही कामगिरी पार पाडली.

या पाच जणांच्या टीमचे नेतृत्व करणाऱ्या आंचल शर्मा, शिवांगी, अपुर्वा गिते या पायलटच्या टीमचा समावेश होता. तर टॅक्टिकल आणि सेन्सर ऑफिसर पूजा पंडा, पूजा शेखावत यांच्याही टीमचा समावेश होता. या सगळ्या महिला अधिकाऱ्यांनी अनेक महिने प्रशिक्षण घेऊन ही मोहीम पार पाडली. भारतीय नौदलाने कायम महिला सक्षमीकरणासाठी पावले उचलली आहेत. त्यामध्ये महिला पायलट्सची निवड, महिला एअऱ ऑपरेशन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

या मोहिमेच्या निमित्ताने अतिशय अनोखा आणि पहिलाच असा पुढाकार भारतीय नौदलाने घेतला. त्यामुळेच महिला अधिकाऱ्यांना अधिक जबाबदारी आणि आव्हानात्मक भूमिकेत कामगिरीचा नवा पायंडा यानिमित्ताने पडणे अपेक्षित आहे. स्वतंत्र अशा ऑपरेशनच्या निमित्ताने महिलांनी पार पाडलेली मोहीम एक आदर्श अशी कामगिरी असल्याचे मत भारतीय नौदलाने मांडले आहे.

Web Title: Historic Achievements Of Indian Navy Women Recorded A New Record North Arabian Sea

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top