महिलांनी अनुभवली इतिहास सफर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

विरार ः वसई येथील सेंट मायकल चर्च माणिकपूर या संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या महिला संघटनेच्या प्रतिनिधींनी जंजिरे वसई किल्ला इतिहास अभ्यास मार्गदर्शन सफरीद्वारे वसई किल्ल्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

विरार ः वसई येथील सेंट मायकल चर्च माणिकपूर या संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या महिला संघटनेच्या प्रतिनिधींनी जंजिरे वसई किल्ला इतिहास अभ्यास मार्गदर्शन सफरीद्वारे वसई किल्ल्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मोहिमेत एकूण ५० महिला सभासद प्रतिनिधींनी सहभाग घेतला. किल्ले वसई मोहीम परिवाराचे इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी त्यांना मार्गदर्शन केले. 
मोहिमेत इतिहासासोबतच "वसई किल्ल्यातील प्रतिकूल परिस्थिती' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सहभागी प्रतिनिधींनी नरवीर चिमाजी आप्पा स्मारकात जुन्या वसईची माहिती घेतली. राऊत यांच्या संग्रही असलेली वसई किल्ल्याची ३०० वर्षांहून अधिक जुनी छायाचित्रे व नकाशे कुतूहलाचा विषय ठरली. यात नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, डॉमिनिकन चर्च, श्री वज्रेश्वरी मंदिर, श्री नागेश्वर मंदिर, साखर कारखाना, जीवनदायी माता चर्च, जोसेफ चर्च, गोन्सालो ख्रिस्तमंदिर आदींची अभ्यासपूर्ण सफर करण्यात आली.

कार्यक्रमाचा समारोप ऐतिहासिक महाविद्यालयात करण्यात आला. किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत संत मायकल चर्च माणिकपूरचे प्रमुख धर्मगुरू फादर नीलम लोपीस यांना वसईच्या इतिहासावर संकलित पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. राजू गव्हाणकर यांनी सहकार्य केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: History travels by women for campaign on the Janjire-Vasai Fort