प्रदीप शर्मा यांच्यावर हितेंद्र ठाकूर यांचा हल्लाबोल 

hitendra.jpg
hitendra.jpg

विरार : विधानसभेची निवडणूक खऱ्या अर्थाने गाजते आहे ती पालघर जिल्ह्यातील नालासोपारा या मतदारसंघात प्रचार करताना दहशत, गुंडगिरी, गोळ्या घालणे अश्या शब्दांची चलती असून, विकासापेक्षा याच मुद्यांवर येथील राजकारण फिरत आहे.

दोन दिवसांपूर्वी नालासोपारा येथील शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूर यांना उद्देशून काही वर्षापूर्वी येथील गुंडाना दोन गोळ्या घातल्या असत्या तर येथील नागरिकांना मोकळा श्वास घेता आला असता, अशी भर सभेत टीका केली होती. त्याला काल उत्तर देताना हितेंद्र ठाकूर यांनी प्रदीप शर्मांना टार्गेट केले.

यावेळी ठाकूर यांनी निवडणुकीच्या दरम्यान गुंडाकरवी खोटा हल्ला सहानभूती मिळविण्यासाठी होणार असल्याची श्यक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यांनी यावेळी सांगितले कि शर्मा हे सुपारी घेऊनच चकमकी करत होते, हे त्यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होते. शर्मा यांनी आजवर केलेल्या सर्व चकमकींतील सत्य बाहेर काढणार असल्याचेही ते म्हणाले.

प्रदीप शर्मा यांनी अनेकांना मारले, आपल्याच सहकाऱ्यांना अडकवले आणि कोटय़वधी रुपयांची माया गोळा केली. शर्मा यांची ही सर्व पापे त्यांना भोगायला लावणार, असेही ठाकूर यांनी सांगितले. नोकरीत असताना खोटे कागदपत्र सादर करून निवडणुकीला उभा राहिलेल्या शर्मा यांची चौकशी डिपार्टमेंट आणि निवडणूक आयोगाने करायला हवी अशी मागणी ठाकूर यांनी यावेळी केली.

यावेळी त्यांनी लखन भैया एन्काउंटरच्या केसमध्ये आपण त्याच्या नातेवाईकांना मदत करण्यास तयार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. प्रदीप शर्मा यांच्या प्रचारात अनेक गुंड फिरत आहेत. या गुंडांकरवी ते खोटा हल्ला घडवून आणून शिवसैनिकाचीच हत्या घडवून आणण्याचा कट असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी कालच्या पत्रकार परिषदेत केला.

या खोटय़ा हल्लय़ाचा आरोप माझ्यावर करून सहानुभूती मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com