
HMPV Virus alert in MumbaI: चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरस वेगाने पसरत असून, त्यामुळे जगभरातील देशांची डोकेदुखी वाढली आहे. चीनच्या अनेक भागांत परिस्थिती बिघडल्याचे पाहायला मिळत आहे.
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या व्हायरसची लागण होत आहे. महाराष्ट्रातदेखील या व्हायरसने शिरकाव केला आहे. एचएमपीव्हीला घाबरण्याची गरज नसल्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
ह्युमन मेटाप्न्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा श्वसनाचा संसर्गजन्य विषाणू आहे. श्वसनाच्या थेंबाद्वारे किंवा दूषित पृष्ठभागाच्या संपर्काद्वारे हा विषाणू पसरतो. त्यामुळे आवश्यकता असल्यास मास्क लावले तरी चालेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.