आचारसंहितेतही बॅनरबाजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

वडाळा - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता जाहीर झाली आहे. या काळात प्रचार किंवा प्रसार करण्यावर राजकीय पक्षांवर बंधने असतात. असे असतानाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)ने हा नियम धाब्यावर बसवल्याचे वडाळ्यामध्ये दिसत आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ डिसेंबरला वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी प्रभाग क्रमांक २०० चे युवा वॉर्ड अध्यक्ष ओम हेमंत सावंत यांनी वडाळ्यातील रफी अहमद किडवाई मार्गावरील ज्ञानेश्‍वर नगर येथील बसथांब्यावर फलक लावले होते. आठवले यांच्या वाढदिवसाला एक महिना झाला. त्यातच निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही हे फलक सावंत यांनी काढले नाहीत. निवडणुकीसाठी आचारसंहिता चालू असतानाही महापालिका एफ-दक्षिण विभागाकडून वजनदार पक्षाचा बॅनर म्हणून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला. 

Web Title: hoarding in wadala