मोखाड्यात अतिवृष्टीमुळे कोसळले घर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

मोखाडा तालुक्यात आठवडाभरापासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतीचे काम ठप्प झालेली आहेत. तर सर्व नद्या आणि तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. याच पावसाने तालुक्यातील खोडाळा तळ्याचीवाडी येथील रामु संजय दिवे या आदिवासीचे आज सकाळी घर कोसळले आहे.​

मोखाडा : मोखाडा तालुक्यात आठवडाभरापासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतीचे काम ठप्प झालेली आहेत. तर सर्व नद्या आणि तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. याच पावसाने तालुक्यातील खोडाळा तळ्याचीवाडी येथील रामु संजय दिवे या आदिवासीचे घर  आज सकाळी कोसळले आहे. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. रामुचा संसार उघड्यावर आल्याने, त्यास शिवसेनेने धान्य, खाद्यपदार्थ आणि संसारोपयोगी साहित्य देऊन मदतीचा हात दिला आहे. 

मुसळधार पावसामुळे खोडाळा तळ्याचीवाडी येथील रामु संजय दिवे या आदिवासीचे घर सकाळी कोसळले आहे. या घरात रामु आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. सकाळी रामु सह पत्नी व मुलं कामासाठी घराबाहेर पडले. त्याचवेळी ही घटना घडली, त्यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. मात्र, रामुचा संसार ऊघड्यावर आला आहे. 
 
शिवसेनेने दिला मदतीचा हात....
या घटनेची माहिती मिळताच, खोडाळा गावचे सरपंच, प्रभाकर पाटील, उपसरपंच मनोज कदम आणि युवा सेनेचे विक्रमगड विधानसभा ऊपअधिकारी राहुल कदम यांनी पिडीत रामु दिवे याची भेट घेऊन, त्याचे सांत्वन केले. तसेच ऊघड्यावर चा संसार सावरण्यासाठी धान्य, तेल यांसह संसारोपयोगी साहित्य शिवसेनेच्या वतीने  देऊन मदतीचा हात दिला आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home collapses due to heavy rains in mokhada