Police
sakal
मुंबई : वाढती लोकसंख्या लक्षात घेता पोलीस आयुक्त कार्यालयाने केलेल्या मागणीनुसार गृह विभागाने मुंबईत चार नवी पोलीस ठाणी, दोन वाढीव परिमंडळे (उपायुक्तांचे कार्यक्षेत्र) आणि तीन सहाय्यक आयुक्त विभाग मंजूर केले आहेत. शुक्रवारी घेण्यात आलेल्या या शासन निर्णयामुळे शहरातील पोलीस ठाण्यांची संख्या १०३, तर परिमंडळांची संख्या १५वर जाणार आहे.