होमगार्ड महिलेला लोकलमध्ये धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई - महिलांच्या आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्यास रोखल्याने होमगार्ड महिलेला धक्काबुकी करून शिवीगाळ करणाऱ्यास बुधवारी अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. परेश दत्ताराम सावंत असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 26 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

लोकलच्या महिला प्रथम श्रेणीच्या महिला डब्यात मंगळवारी (ता. 18) रात्री एक होमगार्ड कर्तव्यास होती. रात्री सव्वानऊच्या सुमारास परेश सावंत महिलांच्या आरक्षित डब्यात घुसला. त्या वेळी होमगार्ड महिलेने त्याला खाली उतरण्यास सांगितले; पण परेशने तिच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले. तिला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Home guards woman Beating in locality Crime