जान सानूच्या अडचणीत वाढ, पोलिस कारवाईचे गृहमंत्र्यांनी दिले संकेत

तुषार सोनवणे
Wednesday, 28 October 2020

जान कुमार सानूनं मराठी गायक राहुल वैद्य याच्या शाब्दिक हल्लाबोल केला. मात्र यावेळी त्याने मराठी भाषेबद्दल अपमानकारक शब्दांचा वापर केला. त्यावर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख य़ांनी दिले आहे.

मुंबई -  बिग बॉसचा 14 वा सिझन सुरु आहे. शोमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोली यांच्यात जोरदार वाद सुरु झाला आहे. या वादा दरम्यान जान कुमार सानूनं मराठी गायक राहुल वैद्य याच्या शाब्दिक हल्लाबोल केला. मात्र यावेळी त्याने मराठी भाषेबद्दल अपमानकारक शब्दांचा वापर केला. त्यावर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख य़ांनी दिले आहे.

राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार; चौकशीसाठी फडणवीसांचं ठाकरेंना पत्र

हिंदी वाहिनीवर सुरू असलेल्या बिग बॉस या रियॅलिटी शोचा 14 वा सिजन चालू आहे. त्यात जान सानूचा खेळादरम्यान एक वाद झाला. या वादा दरम्यान जान कुमार सानूनं निक्की तांबोलीसोबत बोलताना मराठी भाषेची चीड येते असं म्हटलं. निक्कीनं जानसोबत मराठी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जान तिला म्हणाला की, माझ्याशी मराठीत बोलायचे प्रयत्न करु नकोस. माझ्यासोबत बोलायचे असेल तर हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असं तो म्हणाला.

बिग बॉसच्या १४ व्या सिझनमध्ये मराठी गायक राहुल वैद्यही सहभागी झाला आहे. जान कुमार सानू आणि निक्की तांबोली यांच्यात सुरुवातील घट्ट मैत्री होती. काही कारणानं त्यांच्या मैत्रीत फूट पडली. त्यानंतर निक्कीनं जानची मैत्री सोडून राहुलसोबत मैत्री केली.

हिंदुत्व समजून घेण्याची ठाकरेंची बौद्धिक कुवत नाही; भाजप अध्यात्मिक आघाडीची टीका

परंतु जान सानूच्या या वक्तव्यामुंळे मनसे आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.जान कुमार सानूवर पोलिस कारवाई करतील, ते झालं ते चुकीचंं होतं असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

Home Minister hints at police action on jan saanu 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister hints at police action on jan saanu