सासू-सासऱ्यांना छळणाऱ्या सून, मुलाला घर सोडण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई - सासू-सासऱ्यांचा छळ करणाऱ्या सुनेला आणि मुलाला घर सोडून जाण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारी दिले. वृद्ध आई- वडिलांची काळजी घेणे, हे मुलाचे आणि सुनेचे कर्तव्य असते; मात्र या वयात त्यांना न्यायालयात यावे लागते, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

दक्षिण मुंबईत राहणाऱ्या या सुनेच्या वृद्ध सासू-सासऱ्यांनी माझगाव येथील महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सून आणि मुलाविरोधात घरगुती हिंसाचाराची फिर्याद नोंदवली होती. मुलाला आणि सुनेला त्यांच्या घरामध्ये येण्यास मज्जाव करण्याची मागणीही त्यांनी केली होती. ती मान्य करत दंडाधिकारी न्यायालयाने 2017 च्या सुरवातीस प्रतीबंधात्मक आदेश दिले होते. त्याविरोधात सुनेने सत्र न्यायालयात दावा दाखल केला होता.

नवऱ्याची नोकरी आणि मुलीच्या शाळेमुळे आणखी काही दिवसांचा अवधी देण्याची मागणीही तिने केली होती. त्यानुसार सत्र न्यायालयाने सुनेला डिसेंबर महिन्यापर्यंतचा अवधी मंजूर केला होता. आता सुनेने मुलीच्या निकालाचे कारण देत न्यायालयाकडे आणखी मुदत मागितली. त्यावर न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. तीन महिन्यांचे भाडे म्हणून सुनेने सासू-सासऱ्यांना 30 हजार रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

Web Title: home order court