esakal | एपीएमसीतील भाजीपाला मार्केट उद्यापासून बंद राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

एपीएमसीतील भाजीपाला मार्केट उद्यापासून बंद राहणार

मुंबई-ठाण्याला भाजीपाल्याचा पुरवठा ज्या ठिकाणाहून होतो. त्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला संकुल 25 मार्चपासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. भाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली.

एपीएमसीतील भाजीपाला मार्केट उद्यापासून बंद राहणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अत्यावश्‍यक सेवा वगळता मुंबईत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच आता मुंबई-ठाण्याला भाजीपाल्याचा पुरवठा ज्या ठिकाणाहून होतो. त्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला संकुल 25 मार्चपासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. भाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे यांनी दिली. परंतु या काळात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवू नये, यासाठी 24 तारखेला मार्केट सुरू राहणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

ही बातमी वाचली का? कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त ऑन फिल्ड

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्याच्या संरक्षणासाठी भाजीपाला मार्केटमधील व्यापार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारात जवळजवळ शेतमालाच्या एक हजार व ग्राहकांच्या एक हजार गाड्या दैनंदिन येत असतात. त्यामुळे नागरिकांची वर्दळ या ठिकाणी होते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यातच राज्य सरकारकडून 144 कलम लागू करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजीपाला बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही बातमी वाचली का? मुंबईतून आली कोरोनासंदर्भात अत्यंत दिलासादायक बातमी 

या काळात एपीएमसीमधील भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा मार्केट बंद राहणार आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वसामान्यांना या सर्वांचीच चणचण भासण्याची शक्‍यता आहे. याआधी एपीएमसी मार्केटने खबरदारी म्हणून काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी करू नये, यासाठी होलसेल व्यापाऱ्यांनी ग्राहकांना मार्केटमध्ये येण्याऐवजी फोनवरून ऑर्डर देण्याचे आवाहन केले होते. तसेच गुरुवार आणि रविवार असे दोन दिवस एपीएमसी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला संकुल 25 मार्चपासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. भाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 
- शंकर पिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी. 
 

loading image