घरोघरी लसीकरण मोहिमेत ४७१५ जणांची नोंद, महापालिकेची माहिती

६०२ बेडरिडन नागरिकांनी घेतली लस
Corona Vaccination
Corona Vaccinationsakal media

मुंबई : घरोघरी लसीकरण मोहिमेत ( home vaccination drive) आतापर्यंत 4715 जणांनी नोंदणी (registration) केली आहे. तर 602 बेडरिडन नागरिकांनी (bedridden people) लस घेतली आहे, अशी माहिती आज मुंबई महापालिकेच्या (BMC) वतीने मुंबई उच्च (high court) न्यायालयात देण्यात आली. (home vaccination drive-registration-bedridden people-bmc-high court-nss91)

घरोघरी लसीकरण मोहीम सुरू केल्यानंतर आज मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अनील साखरे यांनी माहिती दिली. महापालिकेने ता 30 जुलैपासून मोहीम सुरू केली. डौक्टर आणि रुग्ण सेविका अशी दोन जणांचे पथक नागरिकांच्या घरी जातात, त्यांना कोव्हैक्सिनचे डोस देतात, अशी माहिती साखरे यांनी दिली. या प्रक्रियेत केवळ संबंधित व्यक्तिचे बेडरिडन फिटनेस प्रमाणपत्र मिळत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये नोंदणी करण्यासाठी सामाजिक संस्थेची मदत घेतली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. पुढील सुनावणीला ( ता. 12) या मोहिमेसंबधी तपशील दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच सामाजिक संस्था यामध्ये काय काम करत आहे हेदेखील स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com