आयुष मंत्रालयाच्या ढिसाळ कारभाराचा फटका; होमियोपॅथी महाविद्यालयांच्या परवानग्या रखडल्या

आयुष मंत्रालयाच्या ढिसाळ कारभाराचा फटका; होमियोपॅथी महाविद्यालयांच्या परवानग्या रखडल्या


मुंबई : राज्यात होमियोपॅथी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी होमियोपॅथी महाविद्यालयांना केद्रीय आयुष मंत्रालयाची परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया राबवावी कशी या पेचात होमियोपॅथी महाविद्यालये सापडली आहेत. आयुष मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे महाविद्यालांसह विद्यार्थ्यांचं ही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत 58 महाविद्यालये सुरू आहेत. आयुष मंत्रालयाकडून या विद्यापिठांना दरवर्षी नव्याने परवानगी घ्यावी लागते. मार्च ते एप्रिलच्या दरम्यान या विद्यालयांना परवानगी मिळणे अपेक्षित असून आता डिसेंबर महिना आला तरी या महाविद्यालयांना अद्याप परवानगी मिळालेली नाही.

सेंट्रल काऊंसिलिंग ऑफ होमियोपॅथी विभागाकडून महाविद्यालयांचे सर्वेक्षण केले जाते. फेब्रवारीमध्ये हे सर्वेक्षण सुरू झाले. मात्र त्यानंतर कोरोना संसर्ग पसरल्याने सर्वेक्षणाचे काम ऑनलाईन करण्यात आले. राज्यभरातील 58 महाविद्यालयांनी ऑनलाईच्या माध्यमातून आवश्यक सर्व कागदपत्रांची पर्तता केली. त्यानंतर परवानगी मिळणे अपेक्षित असतांना अद्याप ही परवानगी मिळालेली नाही. 
सेंट्रल काऊंसिलिंग ऑफ होमियोपॅथी विभागाने महाविद्यालयांच्या सर्वेक्षणाचा अहवाल आयुष मंत्रालयाकडे सोपवला आहे. आयुष मंत्रालयाने 20 महाविद्यालयांना परवानगी दिली असून 38 महाविद्यालयांच्या परवानग्या प्रलंबित आहेत.  त्यावर अद्याप निर्णय घेतला नसल्याने या परवानग्या रखडल्या आहेत. त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे. देशभरात 358 होमियोपॅथी महाविद्यालये आहेत त्यातील 80 टक्के महाविद्यालयांच्या परवानग्या रखडल्याची माहिती मिळत आहे. 
राज्यात होमियोपॅथी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया 20 नोव्हेंबर पासून सुरू झाल्या आहेत. मात्र 58 पैकी 38 महाविद्यालयांच्या परवानग्या बाकी असल्याने त्यांतील प्रवेश प्रक्रिया ही रखडल्या आहेत. त्यामुळे 3,800 विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासह काही आयुर्वेदीक महाविद्यालयांच्या परवानग्या देखील असल्याने तेथील 700 विद्यार्थांच्या प्रवेशावर देखील टांगती तलवार लटकली आहे.

परवानगीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे आम्ही जुलै महिन्यात जमा केली आहेत. त्यानंतर परवानगी मिळणे आवश्यक होते. मात्र डिसेंबर महिना आला तरी अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यात राज्यात प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. आम्ही आयुष मंत्रालयासोबत अनेकदा पत्रव्यवहार ही केला मात्र तरीसुद्धा त्यातून काही मार्ग न निघाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ डी जी बागल यांनी सांगितले.

मंत्री महोदयांना वेळ नाही         
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत 58 महाविद्यालये सुरू आहेत. या महाविद्यालयांना दरवर्षी आयुष मंत्रालयाची परवानगी बंधनकारक आहे. यासाठी आवश्यक सर्वेक्षणाचे काम सेंट्रल काऊंसिलिंग ऑफ होमियोपॅथी विभागाकडून केले जाते. त्यांनी आपल्या सर्वेक्षणाचा अहवाल आयुष मंत्रालयाला सादर केला आहे. मात्र आयुष मंत्रालयाचे केद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे गोवा येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत व्यस्त असल्याने  परवानग्यांचे काम रखडलं असल्याची माहिती मिळतेय.
Homeopathy college permits stalled because of ayush ministry

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com