#HopeOfLife : कर्करोगाचा आजार बरा करण्यासाठी...

cancer
cancer

मुंबई : कर्करोगाविरुद्धच्या लढाईत रोगप्रतिकारक शक्‍ती अधिक नियंत्रित करण्यासाठीच्या शक्‍यतेजवळ आपण जाऊन पोहोचलो आहोत. त्यामुळे येत्या काही वर्षांत कर्करोग बरा होणारा आजार होणार आहे. लसीकरण, सेल थेरपी, जीन एडिटिंग आणि मायक्रोबायोम उपचारांच्या मदतीने कर्करोगावर मात करणे शक्‍य होणार आहे.
२१व्या शतकात कर्करोग बरा करणे सध्या निश्‍चितच मोठे आव्हानात्मक झाले आहे. कर्करोगाबाबतच्या जागरुकतेत गेल्या दोन दशकांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भिन्न प्रकारचे कर्करुग्ण समोर येऊ लागले. त्यामुळे केवळ एकच उपचारपद्धती वापरून रुग्ण बरा होऊ शकत नसल्याचे स्पष्ट होऊ लागले. एकच उपचारपद्धतीऐवजी प्रत्येक रुग्णाला त्याच्या विशिष्ट गरजेनुसार उपचार करणे आवश्‍यक आहे. यासाठी कर्करोगावरील अनेक उपचारपद्धती विकसित होण्याची आवश्‍यकता आहे.

गेल्या काही वर्षांत, रोगप्रतिकारक यंत्रणेला ट्युमर ओळखण्यास आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने नवीन तंत्रज्ञानात वाढ झाली आहे. या क्षेत्रास इम्युनो ऑन्कोलॉजी असे म्हटले जाते. या तंत्रज्ञानामुळे कर्करोगाचा उपचार करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा फरक पडू शकतो. तसेच यामुळे आपल्याला आजार बरा करण्याच्या जवळही जाऊन पोहोचतो.

पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे चांगल्या पेशी ट्युमर पेशींमध्ये बदलतात. हे बदल अनेकदा कर्करोगाच्या नवीन उपचाराच्या केंद्रस्थानी असतात; तथापि प्रत्येक ट्युमरमध्ये ते भिन्न असू शकतात. ट्युुमर आणि निरोगी पेशींच्या डीएनए सिक्‍वेन्सची तुलना करून एकापेक्षा अधिक कर्करोगाचे उत्परिवर्तन ओळखता येते. देण्यात येणाऱ्या लसी मेसेंजर आरएनएच्या रूपात देण्यात येतात. यात एक रेणू पेशींना विशिष्ट प्रथिने तयार करण्याच्या सूचना देतो. या परिस्थितीत कर्करोगाचा प्रतिजन (ॲटीबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्‍ताला उत्तेजित करणारा पदार्थ) रोगप्रतिकारक शक्‍ती निर्माण करतो. जनुकीत संपादनाविना या लसी थेट मानवी डीएनएत हस्तक्षेप न करता करता केवळ संदेश देतात. याचा दुसरा फायदा असा की, मेसेंजर आरएनएचे उत्पादन सेल थेरपीसारख्या इतर नवीन कर्करोग तंत्रज्ञानापेक्षा स्वस्त आहे.

क्‍लिनिकल ट्रायलशेव्हचे निकाल जैवतंत्रज्ञाला वैयक्‍तिक लसींची खात्री दर्शवतात. या लसी जेनेटेकच्या मदतीने विकसित केल्या जात आहेत. २०२० च्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये हे तंत्रज्ञान बाजारापेठेसाठी तयार होण्याची शक्‍यता आहे. मात्र, वैयक्‍तिक लस विशिष्ट प्रकारच्या कर्करोगासाठी उपयुक्‍त ठरू शकतात का, खासकरून गर्भाशय किंवा प्रोस्टेट कर्करोगासाठी याबाबत सध्या अनेक वादविवाद आहेत. सीएआर टी थेरपीसारखे तंत्रज्ञान या रुग्णांसाठी कदाचित उपयुक्‍त ठरू शकते, असा दावा करण्यात येतो आहे.

क्रिसपर कॅस ९ पद्धतीने जनुकांमध्ये बदल करण्याची क्षमता अगदी साधी आणि सोपी बनवली आहे. या पद्धतीचा पहिला महत्त्वाचा उपयोग कर्करोग उपचारावर होईल. त्यामुळे उपचार अधिक प्रभावी होण्यास मदत होईल. चीनमध्ये संशोधक क्रिसपर कॅस ९ या पद्धतीचा उपयोग रोगप्रतिकारक टी पेशीमधून पीडी १ नावाचे जनुक काढून टाकण्यासाठी करतात. 
--
चाचणीनंतरच अंमलबजावणी
कर्करोगावरील नव्या तंत्रज्ञानाला अद्याप अनेक चाचण्यांमध्ये त्यांची योग्यता सिद्ध करावी लागेल. त्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी खर्ची घालावा लागेल. अगदी सर्वोत्कृष्ट परिस्थितीत, ती उपलब्ध होईपर्यंत कित्येक वर्षे लोटली जातील. मात्र आपण त्या मार्गावर आहोत, जिथे कर्करोगावर प्रभावी उपचार केले जातील.
पर्याय कार-टी उपचारपद्धतींचा 
२०१८ मध्ये कर्करोगाच्या सेल थेरपीची पहिली मान्यता देण्यात आली. कार-टी सेल थेरपीच्या तंत्रज्ञानामध्ये रुग्णाच्या रोगप्रतिकारक टी सेल घेतल्या जातात आणि विशिष्ट कर्करोगाला संपवण्यासाठी विशिष्ट कर्करोग प्रतिपिंड वापरण्यात येतो. कार-टीच्या क्‍लिनिकल चाचण्यांचे परिणामकारक रुग्ण दिसून आले आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचे इतर काही दुष्परिणामही आहे. हे तंत्रज्ञान आतापर्यंत केवळ रक्‍ताच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी उपलब्ध आहे.  या तंत्रज्ञानाच्या मदतीने ८० टक्‍के कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्याची क्षमता आहे. हे तंत्रज्ञान केवळ रक्‍ताच्या कर्करोगाविरुद्‌धच नव्हे तर इतर कर्करोगांवर प्रभावी ठरू शकते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com