#HopeOfLife : अन्ननलिकेचा कर्करोगही ठरतो जीवघेणा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

कर्करोगाच्या अन्य प्रकारांप्रमाणेच अन्ननलिकेचा कर्करोगही जीवघेणा ठरतो.

कर्करोगाच्या अन्य प्रकारांप्रमाणेच अन्ननलिकेचा कर्करोगही जीवघेणा ठरतो. अनेक रुग्णांमध्ये सुरुवातीला प्राथमिक लक्षणे दिसत नसल्याने किंवा होणारा त्रास गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे हा आजार धोकादायक पातळी ओलांडल्यावर किंवा त्रास वाढत गेल्यावर रुग्ण डॉक्‍टरांकडे जातो; मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असते. बदलती जीवनशैली, निद्रानाश, ऍसिडिटी, अपचन आदींमुळे अनेकांना जेवताना घास अडकल्यासारखा वाटतो किंवा पाण्याचा घोट घेतल्यावरच घास खाली सरकत जातो, अशा तक्रारी घेऊन अनेक व्यक्ती डॉक्‍टरांकडे जातात. अन्ननलिकेतील या त्रासाची अनेक लक्षणे असतात.

#HopeOfLIfe : होय, प्रदूषणामुळे कर्करोग होतो.

त्यातील काही लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात- 

 • - अन्ननलिकेत आलेला पडदा 
 • - दबली गेलेली अन्ननलिका 
 • - हालचाल मंदावलेली अन्ननलिका 
 • - अन्ननलिकेच्या आतील बाजूस आलेली गाठ (जी कर्करोगाचीही असू शकते) 

कारणे 

 • - अतिमद्यपान आणि धूम्रपान 
 • - तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन 
 • - आहारात हिरव्या पालेभाज्यांचा अभाव 
 • - शिळे अन्न खाणे 
 • - आहारात अ, ब, ई जीवनसत्त्वांची कमतरता 
 • - मसालेदार आणि खारट पदार्थांचे सेवन 

#HopeOfLife : यकृताचा कर्करोग कारणे आणि उपचार

 
लक्षणे 

 • - गिळताना त्रास होणे 
 • - छातीत दुखणे 
 • - प्रत्येक घासानंतर पाणी पिण्याची आवश्‍यकता भासणे 
 • - भूक मंदावणे 
 • - वजन कमी होणे 
 • - उलटीची उबळ येऊन अन्न बाहेर येणे 
 • - पोटात किंवा मानेत गाठ लागणे 

आकडेवारी 
मुंबईतील रुग्ण (स्रोत ः मुंबई कॅन्सर रजिस्ट्री, सन 2015) 

  नोंद- मृत्यू
पुरुष 229 178
महिला 208  126

 

भारतातील रुग्ण (स्रोत ः ग्लोबोकॅन, सन 2018) 

  नोंद मृत्यू-
पुरुष 33890
  31337
महिला  18506 15167

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HopeOfLife Cancer of the esophagus can also be fatal