प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचा दावा केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला होता; मात्र वाढत्या प्रदूषणामुळे कर्करोगही होत असल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. त्यासंबंधीची माहितीच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 22 नोव्हेंबर रोजी लोकसभेत दिली होती. त्याशिवाय फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागे प्रदूषण हेदेखील एक कारण असल्याचे तज्ज्ञांनी मान्य केले आहे.

#HopeOfLife : यकृताचा कर्करोग, कारणे आणि उपचार
लोकसभेतील काही सदस्यांनी कर्करोगाबाबत केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरादाखल आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सादर केलेल्या उत्तरात वरील माहिती देण्यात आली. कर्करोगाच्या चार प्रमुख कारणांमध्ये चुकीची जीवनशैली, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन, चुकीचा आहार यासोबतच वायुप्रदूषणाचा समावेश असल्याची माहिती सरकारने लोकसभेत दिली. "इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर' (आयएआरसी) या जगविख्यात संस्थेने प्रदूषणामुळे कर्करोग होत असल्याचे म्हटले. त्याशिवाय कर्करोगाला प्रदूषणही कारणीभूत असल्याची पुष्टी मुंबई कर्करोग रजिस्ट्रीचे मानद सचिव डॉ. विनय देशमाने यांनी दिली.
#HopeOfLife : कर्करोगाच्या तीन हजार रुग्णांसाठी एकच डॉक्टर
ही प्रदूषके धोकादायक
तरंगत्या धूलिकणांमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. तसेच हवेतील कार्बनच्या घटकांमुळेही कर्करोग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार, प्रत्येक घनमीटर हवेत तरंगत्या धूलिकणाचे (पीएम 2.5) प्रमाण 30 मायक्रोग्रॅमपेक्षा कमी असल्यास हवा शुद्ध असल्याचे मानावे; मात्र भारतात हेच प्रमाण 50 मायक्रोग्रॅम एवढे आहे. मुंबईत 2019 या वर्षातील 233 दिवस हवेतील धूलिकणांचे प्रमाण 50 च्या वर होते.
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे मुंबईतील रुग्ण
वर्ष | नवे रुग्ण | मृत्यू |
2010 | 758 | आकडे उपलब्ध नाहीत |
2015 | 887 | 694 |
भारतात 2018 मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे 67 हजार 795 रुग्ण आढळले; त्यापैकी 63 हजार 475 रुग्णांचा मृत्यू झाला होता.