#HopeOfLife : यकृताचा कर्करोग  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

liver

यकृताच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक असून जगभरात दरवर्षी 16 लाख मृत्यू होतात. प्रदूषणाचे वाढलेले प्रमाण, तंबाखू सेवन, धूम्रपान आदी व्यसनांमुळे यकृताचा कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

#HopeOfLife : यकृताचा कर्करोग 

यकृत हा मानवी शरीरातील महत्त्वाचा भाग असून यकृताद्वारे अनेक क्रिया पार पाडल्या जातात. प्रमुख कार्य म्हणजे पचनप्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्‍यक असलेल्या पित्तरसाची निर्मिती केली जाते. त्याशिवाय कर्बोदके, प्रथिने, मेद आदींचे चयापचय, रक्तपेशींची निर्मिती, रक्तातील विविध घटकांचे निर्विषीकरण करण्याचे महत्त्वाचे कार्य यकृत पार पाडत असते. यकृत शरीरातील अनेक जीवनावश्‍यक कार्ये पार पाडत असल्याने यकृताला बाधा झाल्यास अनेक गंभीर परिणाम भोगावे लागतात. कावीळ, हेपॅटॅटिस, कर्करोग आदी प्रमुख आजार कर्करोगाशी संबंधित आहेत. यकृताच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक असून जगभरात दरवर्षी 16 लाख मृत्यू होतात. प्रदूषणाचे वाढलेले प्रमाण, तंबाखू सेवन, धूम्रपान आदी व्यसनांमुळे यकृताचा कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. 
-------------
कारणे 

 •  व्हायरल हेपॅटॅटिस ः जगातील 80 टक्के कर्करोग व्हायरल हेपॅटॅटिसमुळे होतात. 
 •  विषारी पदार्थ ः सातत्याने धूम्रपान, मद्यपान करणे, ऍप्लाटॉक्‍सिन व लोहाचे     प्रमाण जास्त झाल्यास यकृताचा कर्करोग होतो. 
 •  मेटॉबॉलिक कारणे ः मधुमेहाच्या रुग्णांमध्ये यकृताचा सिरोसिस झाल्यास         कर्करोग होण्याची शक्‍यता असते. 
 •  जन्मतः आढळणाऱ्या व्याधी ः बिल्सन डिसिज, अल्फा 1, ऍटिट्रिप्सिनची           कमतरता, हिमोफिलिया आदी आजार झाल्यास कर्करोग होतो. 

हेही वाचा ः आतड्याचा कर्करोग


लक्षणे 

 • अचानक वजनात घट 
 • अशक्तपणा 
 • पोटदुखी 
 • मळमळ आणि उलट्या 
 • ओटीपोटात सूज 
 • पिवळसर त्वचा आणि डोळ्यात पांढरेपणा 
 • पांढरी शौचा होणे 

महत्वाचं :  पुरःस्थ ग्रंथीचा कर्करोग


आकडेवारी 
नव्या रुग्णांची नोंद -

पुरुष48,698   मृत्यू : 45,363 

महिला19,097  मृत्यू18,112

(स्त्रोत ः ग्लोबोकॅन ः वर्ष 2018)  
-- 
यकृताचा कर्करोग होण्याचे सरासरी वय - 54.6 
पुरुष ः महिलांचे गुणोत्तर - 4.5ः1 

Web Title: Hopeoflife Story Liver Cancer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top