मुंबईकरांनो कोरोनासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, ही आहे मुंबईची परिस्थिती...

मुंबईकरांनो कोरोनासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, ही आहे मुंबईची परिस्थिती...

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यातच मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबई हे कोरोनाचं केंद्र बनलं आहे. राज्य सरकार विविध पातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुंबईत अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्णालयं रुग्णासह मृतदेहांनीही भरली आहे. मुंबईत रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे रुग्णालयांसमोर एक मोठं संकट उभं राहिलं आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत शहरातील 99% अतिदक्षता विभागातील बेड  आणि 72% व्हेंटिलेटर व्यापलेले आहेत. धक्कादायक म्हणजे कोविड 19 वर ज्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत ती रुग्णालयं जवळपास 96 टक्के भरले आहेत. या आकडेवारीनुसार, मुंबईतल्या रुग्णालयामध्ये केवळ 1 टक्केच अतिदक्षता विभागातले बेड शिल्लक राहिलेत. 

पालिकेकडून रुग्णालयातल्या बेडसाठी डॅशबोर्ड तयार करण्यात येत असून दर अर्धा तासात रिकाम्या झालेल्या बेडची माहिती तिथे अपलोड होणार आहे. त्यामुळे रुग्णांना रुग्णालय आणि त्यातील बेडची माहिती ऑनलाईन मिळवणं शक्य होणार आहे. मुंबईत सध्या 75 हजार खाटा तयार असून त्यामध्ये सीसीसी 1 आणि डीसीएच यांच्या संख्या 44 हजार आहे. 

मुंबईत रुग्णवाहिकांचा तुटवडा लक्षात घेऊन रुग्णवाहिकांची संख्या वाढवत 456 करण्यात आली आहे. सर्व रुग्णवाहिकांच्या चालकांना पीपीई किट्स उपलब्ध करुन देण्यात आलेत. मुंबईतल्या 33 खासगी रुग्णालयांमध्ये 3 हजार 600 बेड नॉन कोविड रुग्णांसाठी तर 2 हजार 624 बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेत.

मुंबईत या वॉर्डमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त

बुधवारी मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 33 हजार 835 वर पोहोचली. सर्वाधिक कोरोना रुग्ण हे जी उत्तर वॉर्डमध्ये आहेत. या वॉर्डमध्ये धारावी परिसराचा भाग येतो. गेल्या सात दिवसांत कोरोना व्हायरसची नवीन प्रकरणं दररोज सरासरी 5.17 टक्क्यांनी वाढताना दिसताहेत. माहीम, धारावी आणि दादर या परिसरात तब्बल 2 हजार 728 कोरोना रुग्ण आहेत. धारावी परिसरातील वाढत्या प्रकरणांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढतेय. 

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेली धारावी आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. धारावीत कोरोनाने कहर केला आहे.  मुंबईतल्या धारावीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. धारावीतल्या हॉटस्पॉटमध्ये हजारो लोकांची तपासणी करण्यात येतेय, अनेकांना क्वारंटाईन करण्यात येतंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सध्या धारावी परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरातील लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

horrible condition of ICU beds in mumbai read full news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com